मनमाड महामार्गावर संत बार्णबा शाळेसमोर भीषण रस्ता अपघात झाला. ट्रकखाली चिरडून कोमल पगारे या तरुणीचा मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेला पाच वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाला. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. मनमाड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून शाळेसमोर गतिरोधक उभारण्याची मागणी होत आहे.