नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताच्या तयारीसाठी उद्या पोलिसांकडून रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या या सरावात सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियोजनाची पडताळणी केली जाणार आहे.

रामकुंडावरील ध्वजारोहण सोहळा, गोदावरी आरती आणि धर्मध्वज शोभायात्रेच्या मार्गावरील बंदोबस्ताचा सरावही होणार आहे. संभाव्य त्रुटी शोधून त्यात सुधारणा करण्यावर भर दिला जाणार असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज होत आहे.