नाशिक शहरात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो 70 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बाजारातील कांद्याची आवक घटल्याने दर तेजीत असल्याचे चित्र आहे.

लासलगाव बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल 4,930 रुपये भाव मिळाला आहे. तर पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला तब्बल 5,501 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारच्या उपाययोजनांनंतरही कांद्याच्या दरातील तेजी कायम असल्याने ग्राहकांच्या खिशावर त्याचा परिणाम होत आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढल्यानंतर दरात बदल होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.