नाशिक जिल्ह्यातील येवला-नांदगाव रस्त्यावर सोमठाण घाटातील राजापूरजवळ लक्झरी बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती असून, सुमारे पंधरा जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि वाहतूक पोलिसांनी मदत व बचावकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून, अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.