नाशिक जिल्ह्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील एका बंगल्यात सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला.

ग्रामीण आणि शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.

या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यात बनावट चलनाचा मोठा प्रकार समोर आला असून, तपासात आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.