नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील ४५ वर्षीय महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे पडसाद आता जळगावात उमटले आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ कुंभार समाजाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समाजबांधवांनी केली आहे.
महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने या प्रकरणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संपूर्ण घटनेची पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कुंभार समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं? समाजाच्या प्रमुख मागण्या काय आहेत? पाहा संपूर्ण VIDEO.


