नाशिकच्या उपनगर परिसरात कर्ज देण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फायनान्स कंपनीचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून महिलांकडून सोन्याचे दागिने तारण म्हणून घेतल्याचा आरोप आहे.
एका महिलेचे २४ ग्रॅम सोन्याचे दागिने तारण म्हणून घेतल्यानंतर आरोपी कर्ज न देता फरार झाला होता.
या प्रकरणाचा तपास करताना उपनगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
नांदूर नाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी ३१ ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल आणि दोन दुचाकी असा एकूण ४ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींनी फायनान्स कंपनीचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून महिलांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान आरोपींकडून यापूर्वीचे दोन गुन्हेही उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.


