नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार संशयित आणि शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांना अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात ही महत्त्वाची कारवाई मानली जात असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

प्राथमिक तपासात एका संस्थेतील तब्बल १७७ शालार्थ आयडी एकाच दिवशी तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणातील इतर बाबींची चौकशी सुरू असून, तपासानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती.