नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात पोलिसांची कारवाई सुरू असून, फरार आरोपी संजय गरुडला मदत केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या दीपक गरुडला न्यायालयाने 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आणखी तिघांना नोटीस बजावली आहे. फरार आरोपीला मदत केल्याच्या आरोपाच्या अनुषंगाने त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी संबंधितांची भूमिका आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


