“चला, आज काहीतरी बाहेरचं खाऊ!” 😋
मूड चांगला असो किंवा ऑफ, मित्रांची कंपनी असो, घरी पाहुणे आले असोत किंवा पावसाळ्यात काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असो… बाहेरचं खाणं म्हटलं की नाशिककरांच्या चेहऱ्यावर आनंद येतोच! ❤️
याच खाण्याच्या प्रेमातून ‘आपलं नाशिक’ घेऊन आलं आहे एक भन्नाट विशेष कार्यक्रम — ‘बाहेरचं खाऊ’! 🍴
या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करणार आहोत नाशिकची खास खाद्यभ्रमंती. नाशिक शहरातील प्रसिद्ध इटरीज, लोकप्रिय खाद्यपदार्थ, हटके चवी आणि खवय्यांच्या आवडीच्या फूड स्पॉट्सची माहिती या कार्यक्रमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे.
‘बाहेरचं खाऊ’च्या पहिल्याच भागात आपण भेट देत आहोत नाशिकमधील प्रसिद्ध ‘कृष्णय वडापाव सेंटर’ला! 🌶️🥔
Fast Food म्हटलं की सर्वात आधी आठवणारा पदार्थ म्हणजे वडापाव! मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत लोकप्रिय असलेला हा पदार्थ नाशिककरांच्याही आवडीचा आहे. पण कृष्णय वडापाव सेंटरचा वडापाव नेमका एवढा लोकप्रिय का आहे? त्याची खासियत काय आहे? इथली चव इतरांपेक्षा वेगळी कशी आहे? आणि या व्यवसायाचा प्रवास नेमका कसा सुरू झाला?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी रुचा यांनी कृष्णय वडापाव सेंटरला दिलेली खास भेट नक्की पाहा. या भेटीतून केवळ वडापावची चवच नाही, तर त्यामागची मेहनत, व्यवसायाचा प्रवास आणि ग्राहकांचं या फूड स्पॉटकडे असलेलं आकर्षणही जाणून घेता येणार आहे. 😍
तर मग तयार व्हा नाशिकच्या चवींच्या या भन्नाट सफरीसाठी!
पाहा ‘बाहेरचं खाऊ’चा पहिला खास भाग आणि सांगा—नाशिकमधील तुमचा आवडता फूड स्पॉट कोणता? 👇
तुमच्या आवडत्या ठिकाणाचं नाव Commentमध्ये नक्की सांगा. तुमच्या सूचनांमधून ‘बाहेरचं खाऊ’च्या पुढील भागात नाशिकमधील आणखी भन्नाट फूड स्पॉट्सपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल.


