शहापूर तालुक्यातील वासिंद आणि आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिंदाल कंपनीजवळ रेल्वेतून पडून २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेतून पडल्याने संबंधित महिला गंभीर जखमी झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

वासिंद आणि आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान जिंदाल कंपनीजवळ ही घटना घडली. महिलेचा रेल्वेतून नेमका कशामुळे पडून मृत्यू झाला, याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणेकडून घटनेची नोंद घेऊन पुढील तपास आणि कार्यवाही सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे महिलेच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.