स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या अलिबाग-किहीम परिसरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. हजारो तरुणांनी हातात तिरंगा घेत या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. झिराड-कनकेश्वरमार्गे मांडवा असा तब्बल १५ किलोमीटरचा प्रवास तरुणांनी तिरंगा फडकवत केला.

रॅलीदरम्यान सहभागी तरुणांनी तिरंगा हातात घेत देशप्रेमाचा संदेश दिला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी अलिबाग-किहीम परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं.

मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत झालेल्या या रॅलीत राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

देशसेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा रॅलीदरम्यान विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या त्यागाला सलाम करत शौर्याला अभिवादन करण्यात आलं.

तिरंग्याप्रती अभिमान, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. हजारो तरुणांच्या सहभागामुळे अलिबाग-किहीममधील तिरंगा बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.