भांडुप रेल्वे स्थानकात एसी लोकलच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर घडली. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे रूळ ओलांडत असताना मुंबईहून ठाणेमार्गे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलची तरुणाला धडक बसली.
या धडकेनंतर तरुण लोकलसोबत सुमारे पंधरा ते वीस मिनिटे फरफटत गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली. मृत तरुणाची ओळख आणि अपघाताबाबतची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पुढील तपास आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.


