मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यावरील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात आलेल्या या पुलामुळे गोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

 

या नव्या उड्डाणपुलामुळे वाहनचालकांचा वीस ते पंचवीस मिनिटांचा वेळ वाचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः गोरेगाव परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात वाहतूक कोंडी कितपत कमी होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

भविष्यात हा मार्ग वर्सोवा-दहिसर-भाईंदर किनारी रस्त्याशी जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीला किती गती मिळते, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

या नव्या सुविधेबाबत माजी आमदार सुनील प्रभू, उपमहापौर संजय घाडी आणि स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.