नागपूर : नागपूर पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोहीम तीव्र केली असून, एका महिन्यात चार ड्रग्ज टोळ्यांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. यासोबतच शहरातील वाठोडा परिसरात ८७ लाख रुपयांच्या बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बनावट नोटा प्रकरणाच्या तपासात आरोपीने घरात प्रिंटर आणून बनावट नोटा छापल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसकडून सुरू आहे .
दरम्यान, नागपूर पोलिसांकडून अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीविरोधात कारवाई सुरू आहे. एका महिन्यात चार ड्रग्ज टोळ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. केमिकल ड्रग्जच्या वापराबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. ड्रग्जविरोधातील कारवाई आणि बनावट नोटा प्रकरणाच्या तपासाकडे आता लक्ष लागलं आहे.


