रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर टीका केली.
निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सामंत यांनी केला.
EVMबाबत काँग्रेसची भूमिका विजय-पराभवानुसार बदलत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
देशाबाहेर जाऊन पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर टीका करणं राहुल गांधींनी बंद करावं, असं आवाहनही सामंत यांनी केलं.
दरम्यान, राहुल गांधी यांनी अलीकडे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 
उदय सामंतांनी नेमकं काय म्हटलं, जाणून घ्या या बातमीत.
आपलं नाशिक | आपला आवाज