महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी येवला नगरपरिषदेला भेट देत सफाई कामगारांशी थेट संवाद साधला. यावेळी कामगारांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि कामाच्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्या आयोगासमोर मांडल्या. शासन सफाई कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपाययोजना राबवत असून त्यांच्या भत्त्यात वाढ करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती मुकेश सारवान यांनी दिली.

यावेळी कामगारांच्या समस्या शासन स्तरावर मांडून त्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही देण्यात आले. त्यामुळे सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.