दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने राजकीय विरोधक मानले जाणारे कपिल पाटील आणि बाळ्या मामा एकाच मंचावर पाहायला मिळाले. दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं.

 

 

या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची परिसरात चर्चा रंगली आहे. दहीहंडी उत्सवातील या भेटीमुळे दोन्ही नेत्यांच्या एकत्र उपस्थितीकडे लक्ष वेधलं गेलं.

 

 

दरम्यान, उत्सवात उपस्थित असलेल्या गोविंदांनी बाळ्या मामांना गाणं गाण्याचा आग्रह केला. गोविंदांच्या आग्रहाखातर बाळ्या मामांनी गाणं सादर केलं.

या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, राजकीय वर्तुळातही या भेटीची चर्चा होत आहे.