नाशिक : राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड आणि गोदाघाट परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. यासाठी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी परिसरातील दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्यात येणार असून, सुरक्षेच्या कारणास्तव काही भाग पडद्यांनी झाकण्यात येणार आहेत.
ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी मिरवणूक मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. अंतर्गत रस्ते आणि गल्ल्यांमध्येही बॅरिकेड्स लावून संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


