नाशिकच्या सिद्धार्थ नगर प्रभाग क्रमांक २३ मधील ममता आनंद संकुल सोसायटीची संरक्षण भिंत रविवारी रात्री अचानक कोसळली.
भिंतीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्याने चार ते पाच दुचाकी ढिगाऱ्याखाली अडकल्या.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच योगेश आप्पा म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून ढिगारा हटवण्याचे काम केले.
ढिगारा हटवल्यानंतर त्याखाली अडकलेल्या दुचाकी बाहेर काढण्यात आल्या.
या घटनेनंतर संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
भिंतीची तातडीने पाहणी करून बांधकामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन परिसरातील धोकादायक बांधकामांची पाहणी करावी, अशीही मागणी होत आहे.
नाशिक शहर
ब्रेकिंग
सिद्धार्थ नगरमध्ये संरक्षण भिंत कोसळली; ४ ते ५ दुचाकी ढिगाऱ्याखाली अडकल्या
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी
नाशिक शहर
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून रामकुंड परिसरातील तयारीचा आढावा
नाशिक शहर
कुंभमेळा सोहळ्याचं राज्यपालांना निमंत्रण; गिरीश महाजन यांनी घेतली भेट
नाशिक शहर
नाशिकच्या ऐतिहासिक मंदिरांसाठी ९.२० कोटी मंजूर; रामकाल पथ प्रकल्पाला गती
नाशिक शहर
गोदावरी नदीपात्रात जिवंत जलस्रोत असल्याचा दावा; रामकुंडासह कुंड काँक्रीटमुक्त करण्याची मागणी


