नाशिकच्या सातपूर-अंबड लिंक रोड परिसरात मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.
संजीव नगरजवळ बुधवारी सकाळी सुरू असलेल्या कामादरम्यान जेसीबीचा धक्का लागल्याने ३०० मिमी व्यासाची पाइपलाईन फुटली.
पाईपलाईन फुटल्यानंतर पाण्याचे फवारे २० ते ३० फूट उंच उडत होते.
पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने परिसरात काही काळ पाणी साचले.
घटनेची माहिती मिळताच मनपा पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाणीपुरवठा बंद केला.
त्यानंतर पाइपलाईन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
या घटनेमुळे सातपूर मळे विभाग, केवल पार्क, संजीव नगर तसेच अंबड आणि सिडको परिसरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
सायंकाळपर्यंत दुरुस्ती पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.