त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी रस्त्याच्या कामावर आमदार हिरामण खोसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याची पाहणी करताना कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला.

“कामात कोणतीही क्वालिटी नाही”, असा थेट आरोप करत आमदार खोसकर यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रस्त्याच्या कामात दर्जाबाबत तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. या पाहणीनंतर संबंधित कामाची गुणवत्ता आणि जबाबदार व्यक्तींवर होणारी कारवाई याकडे आता लक्ष लागले आहे.