नाशिकमध्ये ५०१ जणांच्या सामूहिक शंखनादातून विश्वविक्रमाचा सोहळा पार पडल्यानंतर गोदावरी नदीची आरती करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यामुळे गोदातीरावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गोदावरी नदीची आरती संपन्न झाली. या वेळी साधू-महंत, जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आणि मोठ्या संख्येने नाशिककर उपस्थित होते. सामूहिक शंखनादानंतर झालेल्या या आरतीने कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली.


