नाशिकच्या त्र्यंबक रोडवर रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्यात भाजीवाल्याचा टेम्पो अडकल्याची घटना समोर आली आहे. त्र्यंबक रोडहून सातपूर इंडस्ट्रियल एरियाकडे जात असताना हा टेम्पो खड्ड्यात अडकल्याने चालकाची चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेमुळे नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

त्र्यंबक रोड परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे Potholes पडले असून वाहनचालकांना या खड्ड्यांमधून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्यासोबतच दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांच्या Accident Riskमध्येही वाढ झाली आहे.

दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या “आता कसं भाऊ म्हणतील तसं!” या होर्डिंगची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र एकीकडे होर्डिंग चर्चेत असताना दुसरीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.

सातपूर इंडस्ट्रियल एरियाकडे जाणाऱ्या मार्गावर भाजीवाल्याचा टेम्पो खड्ड्यात अडकल्याने वाहतूक आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून वाहनचालकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

होर्डिंगची चर्चा होतेय, पण रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कधी सुटणार? असा सवाल आता नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.