नाशिकच्या वासन नगर, पाथर्डी फाटा आणि ज्ञानेश्वर नगर परिसरात खड्डे, साचलेलं पाणी, Drainage Leak आणि मोकाट कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून मोठमोठ्या खड्ड्यांमधून वाहनचालकांना मार्ग काढावा लागत आहे.
पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने Potholes दिसेनासे होतात. त्यामुळे दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याच परिसरात Drainage Pipeline Leak झाल्याने रस्त्यावर सतत पाणी साचत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या पाण्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यातच परिसरात Stray Dogs चा सुळसुळाट वाढल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. रस्त्यावर अचानक धावणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
खड्डे + साचलेलं पाणी + Drainage Leak + Stray Dogs, अशा तिहेरी-चौपदरी समस्यांनी वासन नगर-पाथर्डी फाटा परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासनाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती, ड्रेनेज गळतीची समस्या आणि मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


