गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोदकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गणरायाचा आवडता नैवेद्य म्हणून मोदकांना मोठी मागणी असते. मात्र, यंदा मोदकांच्या किमतीत सुमारे 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नाशिकच्या बाजारात सध्या उकडीचा मोदक 35 ते 40 रुपये नग या दराने विकला जात आहे. तर ड्रायफ्रूट मोदकाचा दर तब्बल 9 हजार 200 रुपये किलो इतका आहे. त्यामुळे ग्राहकांना यंदा मोदकांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

बाजारात ग्राहकांच्या पसंतीनुसार मोदकांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये उकडीचा, तळणीचा, केशर, मावा, मलाई, चॉकलेट, लेमन, खजूर आणि ड्रायफ्रूट मोदकांचा समावेश आहे. पारंपरिक मोदकांसोबतच वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या मोदकांनाही ग्राहकांकडून मागणी मिळत आहे.

गणेशोत्सव जवळ आल्याने मोदकांच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशभक्तांकडून आपल्या आवडीनुसार पारंपरिक तसेच आधुनिक प्रकारच्या मोदकांची खरेदी केली जात आहे.

दरवाढीमुळे मोदकांच्या किमती वाढल्या असल्या तरी गणेशोत्सवाच्या उत्साहात मोदकांची मागणी कायम असल्याचं चित्र नाशिकच्या बाजारात पाहायला मिळत आहे.