नाशिक म्हटलं की त्र्यंबकेश्वर, पंचवटी, रामकुंड आणि पांडवलेणी यांसारखी धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळं डोळ्यासमोर येतात. मात्र नाशिकची पर्यटनसंपदा यापेक्षाही मोठी आहे.
धार्मिक पर्यटनासोबत निसर्ग पर्यटन, ऐतिहासिक वारसा, किल्ले, लेणी, धबधबे आणि ग्रामीण पर्यटनाचा विकास कसा करता येईल? पर्यटनस्थळांवरील स्वच्छता, पाणी, शौचालयं, पार्किंग, सुरक्षितता आणि वाहतूक सुविधा कशा सुधारता येतील? पर्यटन वाढल्यास स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात?
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने नाशिकच्या पर्यटन विकासाची संपूर्ण परिस्थिती जाणून घ्या या विशेष व्हिडिओमध्ये.
आपलं नाशिक | आपला आवाज


