नाशिकमध्ये काँग्रेसचं दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर सुरू असून, राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २४ ऑगस्टपासून सुरू झालेलं हे प्रशिक्षण शिबिर २ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या शिबिराच्या समारोपाला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. नेमका दौरा आणि उपस्थितीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.