नाशिक तालुक्यातील ओढा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिक आणि शेतकरी चिंतेत होते. अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.