शहरातील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेने कारवाई केली आहे. आडगाव नाका ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि पत्र्यांच्या शेड हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.

 

नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त (अतिक्रमण) सुवर्ण दखणे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. पंचवटी आणि सातपूर विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली.

 

या कारवाईत पंचवटी विभागाचे गाडीप्रमुख प्रवीण बागुल, जीवन ठाकरे यांच्यासह संबंधित महापालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संबंधित मार्गावरील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि पत्र्यांच्या शेडवर कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले.

 

महापालिकेच्या या संयुक्त मोहिमेमुळे आडगाव नाका ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांबाबत महापालिका प्रशासनाकडून पुढे कोणती पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागले आहे.