डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील आजच्या न्यायालयीन कारवाईकडे लक्ष लागलं आहे.
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर डॉ. नीलेश जेजुरकर यांच्यावर गुन्हे शाखेकडून अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता डॉ. नीलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण या दोघांनाही न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान, डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूशी संबंधित विविध पुरावे पोलिसांकडून तपासले जात आहेत. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आजच्या न्यायालयीन सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे.


