नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोंडे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर तिच्या आजीचे अपहरण करून हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कुंभार समाज आक्रमक झाला असून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.

प्रकरण मागे घेण्यासाठी तीन लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा दावा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.

हा प्रस्ताव नाकारल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आजीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक अर्थात SIT मार्फत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे आणि प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कुंभार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.