एसआयआर मोहिमेत अपेक्षित कमिटेड मतदारांचे अर्ज कमी भरल्याने भाजपची चिंता वाढल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील पदाधिकाऱ्यांची एसआयआरबाबत बैठक पार पडली.
पंचवटीतील स्वामीनारायण सभागृहात झालेल्या बैठकीत मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यात आला.
काही मतदारसंघांमध्ये अपेक्षित काम झाले नसल्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.
संपर्काबाहेर असलेल्या मतदारांचा बूथनिहाय शोध घेऊन त्यांचे अर्ज भरून घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
मतदारयादीतील त्रुटी दूर करणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यावरही भर देण्यात आला.
एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्यात बूथ पातळीवरील काम अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मतदारयादीच्या कामाला अधिक वेग दिल्याचे या बैठकीतून दिसून आले.