उपनगरमध्ये १७ वर्षीय युवराज ठोकेंवर प्राणघातक हल्ला; दुचाकीला धडक देत खाली पाडलं, मारहाणीचा आरोप

नाशिकच्या उपनगर परिसरात १७ वर्षीय युवराज ठोके याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात युवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रेडियंट हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, युवराजच्या दुचाकीला धडक देऊन त्याला खाली पाडण्यात आलं. त्यानंतर बंटी काळे याच्यासह इतर संशयितांनी युवराजवर मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. हल्ल्यात युवराजला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर उपनगर परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकरणी उपनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पीसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हल्ल्यामागील नेमकं कारण काय होतं? युवराजला लक्ष्य करण्यामागे कोणाचा हात आहे? तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. संशयितांची नावे समोर आली असून पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व बाजू तपासल्या जात आहेत.

घटनेमुळे उपनगर परिसरात चर्चेला उधाण आलं असून पोलिसांच्या तपासानंतर या हल्ल्यामागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

लोकेशन : उपनगर, नाशिक

आपलं नाशिक | आपला आवाज