सप्तशृंगीगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी अपडेट; रस्ताबंदी आदेशात सुधारणा
सप्तशृंगीगडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १० ते २६ सप्टेंबरदरम्यान लागू करण्यात आलेल्या नांदुरी-सप्तशृंगीगड रस्त्याच्या रस्ताबंदी आदेशात सुधारणा करण्यात आली आहे.
सुधारित आदेशानुसार, १२, १३, १९, २० आणि २६ सप्टेंबर या दिवशी नांदुरी-सप्तशृंगीगड रस्ता वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे या दिवशी सप्तशृंगीगडावर जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रस्ताबंदीच्या कालावधीत निवडक दिवशी वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भाविकांनी प्रवासाचे नियोजन करताना सुधारित वेळापत्रक लक्षात घेणे आवश्यक आहे.
सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक गडावर येत असतात. त्यामुळे रस्त्याच्या वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेला हा बदल भाविकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
१२, १३, १९, २० आणि २६ सप्टेंबरला नांदुरी-सप्तशृंगीगड रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार असून, भाविकांनी प्रवासापूर्वी सुधारित आदेशाची माहिती लक्षात घेऊन नियोजन करावे.
आपलं नाशिक | आपला आवाज


