नाशिकच्या पाथरडी–दाढेगाव फरशी पुलावरून दुचाकीसह वाहून गेलेल्या तरुणाचा शोध अद्याप सुरू आहे. शोधमोहीमेदरम्यान एनडीआरएफची बोट नदीत पलटल्याची घटना घडली. बोटीत असलेले सहाही जवान सुरक्षित असून त्यांनी तात्काळ स्वतःचा बचाव केला. वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, या पुलावर यापूर्वीही अनेक दुर्घटना घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पुलाची उंची वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
दाढेगाव पुलावरून तरुण वाहून गेला; शोधादरम्यान NDRFची बोट पलटली
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती
ब्रेकिंग न्यूज
महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दोन तास जनतेसाठी खुले; दुपारी ३ ते ५ जनता दरबार
ब्रेकिंग न्यूज
अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामांना आठ दिवसांची मुदत; मुदतीनंतर रस्ते खोदाई बंद
ब्रेकिंग न्यूज
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी


