पेठ तालुक्यातील कोटंबी गावाजवळ नाशिक-गुजरात महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास आयशर ट्रकचा अपघात झाला.

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मालवाहू आयशर रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन पडला.

अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, आयशर ट्रक बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची आवश्यकता भासली.

या अपघाताचा फटका कोटंबी येथील शेतकरी मयूर भुसारे यांच्या शेताला बसला.

शेतातील बोरवेल, मोटार, पाइप आणि १५ ते २० आंब्याची झाडे यांचे नुकसान झाले.

या नुकसानीची किंमत जवळपास दीड लाख रुपये असल्याचा दावा शेतकरी मयूर भुसारे यांनी केला आहे.