नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडे न तोडता साधूग्राम उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. साधूग्राम परिसरातील एक हजार आठशे पंचवीस झाडांच्या वृक्षतोडीचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित आहे.

या प्रकरणाची नऊ डिसेंबर रोजी हरित लवादात सुनावणी होणार आहे. न्यायालयीन निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाणार असून, पर्यावरणाचे संरक्षण करत सिंहस्थाची कामे पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.