नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावर अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी मोहीम राबवली. गडावरील १३ अन्न आस्थापनांवर कारवाई करत १४०८ किलो पामतेलयुक्त मावासदृश्य साठा नष्ट करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे पाच लाख ६२ हजार रुपये आहे.
तपासणीदरम्यान १८ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एफडीएने केलेल्या या कारवाईचा सविस्तर आढावा पाहा.


