नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावर व्हीआयपी वाहनांच्या प्रवेशास पूर्णबंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व्हीआयपींना नांदुरी येथून बसने गडावर जावे लागणार आहे. तसेच पायी येणाऱ्या भाविकांना दर्शनात प्राधान्य, पिण्याच्या पाण्याची दररोज तपासणी, प्लास्टिक कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि वनविभागाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची तैनाती असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.