इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजारपेठेत अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यांसह अरुंद गल्ल्यांमध्येही वाहतूक कोंडी होत असल्याने शाळकरी मुले, व्यापारी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.घोटी बाजारपेठेतील परिस्थितीचा आढावा घेतला आहे, आपले प्रतिनिधी विकास काजळे यांनी. घोटीतील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या समस्यांबाबतचा हा ग्राउंड रिपोर्ट पाहा. आपलं नाशिक | आपला आवाज