दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. बागलाण तालुक्यातील चौगाव येथील लक्ष्मण मांडवडे यांनी पाण्याअभावी आपली दोन एकर द्राक्षबाग तोडण्याचा निर्णय घेतला आहे. अकरा वर्षे मेहनतीने जोपासलेली बाग तोडण्याची वेळ आल्याने दुष्काळाची तीव्रता आणि शेतीसमोरील संकट अधोरेखित झालं आहे. 

आपलं नाशिक | आपला आवाज