वनहक्क पट्ट्यांच्या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने आंदोलक सहभागी झाले असून, प्रलंबित वनहक्क दाव्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

उपग्रह प्रतिमांच्या आधारे वनहक्क दावे मंजूर करावेत आणि पात्र लाभार्थ्यांना वनहक्क पट्टे द्यावेत, अशी आंदोलकांची मागणी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत मागण्यांसाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.