नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये अवैध दारू विक्रीप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत दादा बुधर याला अटक करण्यात आली असून, काकड पाडा परिसरातून मद्यसाठा आणि बनावट बुच जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

दमनमधून आणलेल्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल लावले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्र्यंबकेश्वरमधील अवैध दारू विक्रीविरोधात किसान सभेकडून कारवाईची मागणी करण्यात आली होती. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.