कोर्टाची पायरी चढताना सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. न्यायालयीन कोठडी आणि पोलीस कोठडीमध्ये नेमका काय फरक असतो? केसचा विलंब का होतो? अशा प्रकरणांमध्ये मिळणारा परतावा कसा ठरतो? आणि एका राज्यातील केस दुसऱ्या राज्यात लढवता येते का?
या सर्व महत्त्वाच्या कायदेशीर प्रश्नांवर ‘आपलं नाशिक’ने घेतलेली मंदार भानुसे यांची विशेष मुलाखत.
या मुलाखतीत कोर्टाची प्रक्रिया, पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी, केसला लागणारा वेळ, परतावा आणि वेगवेगळ्या राज्यांशी संबंधित कायदेशीर प्रकरणांबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कायदा समजून घेण्यासाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबतची मूलभूत माहिती जाणून घेण्यासाठी ही विशेष मुलाखत नक्की पाहा.
आपलं नाशिक | आपला आवाज


