FIR म्हणजे काय? NC दाखल झाल्यानंतर पुढे काय होतं? तक्रारदाराचे अधिकार कोणते? | ‘कोर्टाची पायरी चढताना’ – भाग १ ⚖️

पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ आली की अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो — FIR कशी दाखल करायची? तक्रार घेतली नाही तर काय करायचं? NC आणि FIR मध्ये नेमका फरक काय? कायदेशीर प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक अनेकदा संभ्रमात पडतात.

याच महत्त्वाच्या प्रश्नांची सोप्या आणि स्पष्ट भाषेत उत्तरं देणारी विशेष मालिका ‘आपलं नाशिक | आपला आवाज’ घेऊन आलं आहे — ‘कोर्टाची पायरी चढताना’.

या मालिकेच्या पहिल्या भागात प्रसिद्ध नाशिकचे वकील ॲड. मंदार भानोसे यांच्याशी खास संवाद साधण्यात आला आहे. एखादी घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात गेल्यावर नेमकी प्रक्रिया काय असते, FIR म्हणजे प्रथम खबरी अहवाल काय असतो आणि तो कधी दाखल केला जातो, यापासून या भागाची सुरुवात होते.

मारहाणीची तक्रार असल्यास मेडिकल का महत्त्वाचं? फसवणुकीच्या प्रकरणात कागदपत्रांची तपासणी का केली जाते? एखादी तक्रार दखलपात्र की अदखलपात्र, हे कसं ठरतं? NC म्हणजे काय आणि NC नंतर पोलिसांची भूमिका काय असते? हे प्रश्नही या भागात सविस्तर समजून घेता येणार आहेत.

इतकंच नाही तर, एखाद्या किरकोळ वादाची नोंद NC म्हणून झाल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली तर NC चे पुढे FIR मध्ये रूपांतर होऊ शकतं का? तक्रारदाराला आपल्या तक्रारीवर झालेल्या कारवाईची माहिती घेण्याचा अधिकार आहे का? वारंवार NC दाखल होणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई कशी होऊ शकते? यावरही ॲड. मंदार भानोसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

दखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतरची मेडिकल प्रक्रिया, घटनास्थळ पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, आरोपीची अटक, २४ तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे आणि पोलीस कस्टडी यांसारख्या पुढील प्रक्रियेवरही या भागात प्रकाश टाकण्यात आला आहे.

कायदा फक्त वकिलांसाठी नाही, तर प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आहे! ⚖️
म्हणूनच पोलीस ठाण्यात तक्रार करताना आपले अधिकार आणि कायदेशीर प्रक्रिया समजून घेण्यासाठी ‘कोर्टाची पायरी चढताना – भाग १’ नक्की पाहा.

आपलं नाशिक | आपला आवाज
🎥 कोर्टाची पायरी चढताना | Episode 1
⚖️ कायदा समजून घ्या... आपले अधिकार जाणून घ्या!