अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ येवला शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून दोषींना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तसेच या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.