नाशिकरोडच्या गोसावीवाडीत रविवारी झालेल्या सुमित पगारे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘आपल्यातील वाद मिटवू’ असा बहाणा करत सुमित पगारे यांच्याशी हात मिळवण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर नाशिकरोड पोलिस, क्राईम युनिट आणि गुंडा विरोधी पथकाने संयुक्त तपास सुरू केला.
या संयुक्त कारवाईत अवघ्या २४ तासांत १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहेत.
या प्रकरणातील मुख्य शूटर राजिक शेख याच्यासह आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, कारवाईदरम्यान पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हत्येमागील नेमका कट, गोळीबाराची पार्श्वभूमी आणि इतर संशयितांची भूमिका तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.