पावसाळा हा निसर्गाने दिलेल्या पौष्टिक रानभाज्यांचा हंगाम मानला जातो. विविध प्रकारच्या रानभाज्या या काळात उपलब्ध होत असून त्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानल्या जातात. योग्य पद्धतीने आहारात त्यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक मिळण्यास मदत होते.

"आपला डाएट" या विशेष कार्यक्रमात आहारतज्ज्ञ पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या प्रमुख रानभाज्या, त्यांचे पोषणमूल्य आणि आरोग्यदायी फायदे याविषयी सविस्तर माहिती देत आहेत. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांची भूमिका काय असते आणि त्या दैनंदिन आहारात कशा समाविष्ट कराव्यात, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे.

याशिवाय रानभाज्या निवडताना, स्वच्छ करताना आणि खाताना कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भातील महत्त्वाच्या सूचनाही या भागात दिल्या आहेत. निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहाराचे महत्त्व आणि पावसाळ्यातील नैसर्गिक अन्नघटकांचा योग्य वापर कसा करावा, याबाबतची उपयुक्त माहिती या कार्यक्रमातून मिळणार आहे.