तुम्ही बारीक आहात आणि वजन वाढवण्याचा प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीये? सतत अशक्तपणा, कमी ऊर्जा, भूक न लागणे किंवा पचनाच्या समस्या जाणवतात का? वजन कमी असण्यामागे आनुवंशिकता, अपुरा आहार, जीवनशैली आणि इतर कारणे असू शकतात. या भागात जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी आहारात कॅलरींचे प्रमाण कसे वाढवावे, पौष्टिक आणि ऊर्जा देणारे पदार्थ कोणते निवडावेत, दिवसातून किती वेळा खावे आणि व्यायामाची भूमिका काय आहे. फक्त वजन वाढवण्यापेक्षा शरीराच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात वजन वाढवणे आणि स्नायूंच्या वाढीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. वजन, आहार आणि आरोग्याविषयी उपयुक्त माहितीसाठी पाहत राहा Apla Diet, आपलं नाशिकवर! #वजनवाढ #वजनवाढवण्याचेउपाय #पौष्टिकआहार #आरोग्य #आहार #WeightGain #HealthyWeightGain #WeightGainTips #AplaDiet #AplaNashik